Marathi News

mumbai news paper,mumbai news in marathi,navi mumbai news,mumbai news today rain,mumbai local news live,tv9 mumbai news,mumbai crime news,thane news

No comments

मुंबईच्या वाढत्या गर्दीत हरवत चालला आहे मराठी माणूस?




आज सगळीकडे पाहिलं तर प्रत्येक मराठी माणूस स्वतःच घरं घेण्यासाठी बदलापूर, विरार, नालासोपारा या ठिकाणी वावरत आहे. खरं तर जो मराठी माणूस काही काळा आधी लालबाग, परळ या ठिकाणी दिसत होता तो आटा फक्त त्या ठिकाणी नोकरीसाठीच दिसतो. आज एवढे मोठं-मोठे टॉवर उभे राहत आहेत. तिथे मराठी माणूस का घरं घेऊ शकत नाही. तर इथे प्रश्न येतो पगार - इनकम. "आमचा पगार एवढा नाही म्हणून आम्ही मोठ्या टॉवर मध्ये घरं घेऊ शकत नाही." पण इथे घरं घेणारे गुजराती आणि मारवाडी असतात तिथे ते घरं घेतात आणि मुंबई स्वतःच्या बापाची असल्या सारखा मिरवतात आणि आपण मात्र नोकरी लागल्यावर पगार आणि रिटायरमेंट नंतर पेन्शन याचीच वाट बघत राहतो. आपण आपल्या मुलांना शिकवतो चांगलं शिक्षण घे, नोकरी कर. पण ज्या कंपनी मध्ये आपण नोकरी करतो त्या कंपनीच्या मालकाच्या बापाने त्याला सांगितलेला असता कि तू धंदा कर. तो धंदा करतो त्याची जास्त कमावण्यासाठी आणि आपण त्याच्याकडे नोकरी करतो त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी.
आज मुंबईत दिवसेंदिवस गर्दी वाढत चाली आहे. भीती वाटते कि या गर्दीत जर आपला मराठी माणूस हरवला तर?
त्यामुळे आत्ताच जागे व्हा आणि आपलं स्थान मिळवायला सुरुवात करा!
जय मराठी, जय महाराष्ट्र! 
No comments

राज्यात 'या' दिवशी अतिवृष्टीचा इशारा


अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे येत्या ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान, राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे, समुद्रात वाऱ्याचा वेगही अधिक असल्याने मच्छीमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे विभागातील सर्व जिल्हा यंत्रणांना उपाय-योजनेसह तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस सुरुच आहे. परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शेतात काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक शेतात पाणी शिरल्याने पिकं सडली आहेत. द्राक्षांच्या बागा, भात पिक, ज्वारी, सोयाबिन पिकांचं चांगलंच नुकसान झालं आहे. हाता-तोंडाशी आलेलं पिकं असं वाया गेल्याने बळीराजा पुरचा कोलमडला आहे. आता पुन्हा हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उरलेल्या पिकाची धास्ती निर्माण झाली आहे.
No comments

पोस्टाच्या या योजनेचा दुहेरी लाभ, बचतही होणार आणि दर महिन्याला कमाईही


आपलं भविष्य सुरक्षित असावं यासाठी गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. आपल्या कमाईचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले नाहीत तर ही कमाई वाया जाते. त्यामुळे गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय म्हणून पोस्ट ऑफिसच्या या योजनेकडे पाहिलं जातंय.
पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीममध्ये तुम्ही पैसे गुंतवलेत तर तुमची चांगली कमाईही होईल.
हे होतील 4 फायदे
पोस्ट ऑफिसच्या या मंथली इनकम स्कीममध्ये कुणीही खातं उघडू शकतं. बँकेत केलेलं एफडी किंवा डेट इन्स्ट्रुमेंटच्या तुलनेत तुम्हाला जास्त लाभ मिळतो. दर महिन्याला निश्चित उत्पन्नही मिळतं आणि ही योजना पूर्ण झाली की सगळी रक्कम मिळते. ही रक्कम पुन्हा गुंतवली तर महिन्याभराच्या उत्पन्नाची सोय होते.
खातं कोण उघडू शकतं ?
तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने खातं उघडू शकता. जर तुमचं मूल 10 वर्षांपेक्षा कमी वयाचं असेल तर त्याच्या नावावर त्याचे पालकही हे खातं उघडू शकतात.
किती पैसे गुंतवाल ?
या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये जमा करू शकता तर कमीत कमी 1500 रुपये जमा करता येतील.
महिन्याला किती रुपये मिळतील?
या योजनेत वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळेल. हे व्याज 12 महिन्यांमध्ये विभागलं जातं. तुम्ही जर 9 लाख रुपये जमा केले असतील तर वर्षाला तुम्हाला 65 हजार 700 रुपये मिळतील. दर महिन्याला 5 हजार 500 रुपयाचं उत्पन्न मिळेल. ही योजना पूर्ण झाल्यानंतर 9 लाख रुपयांत आणखी काही बोनस जोडून पैसे मिळतील. ही योजना 5 वर्षांनी पूर्ण होते
No comments

२०५० पर्यंत मुंबई-ठाणे-नवी मुंबई या शहरांना जलसमाधी मिळणार?



गेट वे ऑफ इंडिया' डोळेभरुन पाहा... नरिमन पॉईंट आणि कुलाबा फिरून घ्या... शिवाजी पार्कही डोळ्यात साठवून घ्या... सीएसएमटी स्टेशनवरही एक फेरफटका मारुन घ्या... कारण येत्या काही वर्षांत हे सगळं पाण्याखाली जाणार आहे. तुमचं आवडतं शहर असलेल्या मुंबईला जलसमाधी मिळणार आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचं आयुष्य फक्त ३१ वर्षांचं राहिलंय. २०५० पर्यंत देशाची शान असलेली ही शहरं समुद्रात बुडणार आहेत.
जागतिक तापमानवाढीमुळे दक्षिण आणि उत्तर धुव्रावरचं बर्फ वितळतंय. बर्फ वितळण्याचा वेग असाच कायम राहिल्यास समुद्राची पातळी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळं २०५० पर्यंत मुंबईला जलसमाधी मिळेल असा अंदाज 'को-ऑर्डिनेटर डायना लोनेस्को' या संस्थेनं वर्तवलाय. 
या संस्थेच्या माहितीनुसार, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, कुलाबा, मलबार हिल, दादर, वरळी, वांद्रे, चेंबूर आणि वर्सोवा समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे. जवळपास निम्मी मुंबई समुद्र गिळून टाकणार आहे. हा धोका फक्त मुंबईसाठीच नाही. तर मुंबईजवळच्या ठाणे, आणि नवी मुंबईलाही असणार आहे.
मुंबईतले अनेक भाग समुद्रात भराव टाकून तयार करण्यात आलीय. त्यातच तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढतेय. ही वाढ अशीच राहिली तर मुंबई पाण्याखाली जाईल. गेल्या काही वर्षात शिवाजी पार्क परिसरात समुद्राच्या उधाणाचं पाणी घुसतंय. हे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आहे. ज्या माणसांनी मुंबई तयार केली त्याच माणसाच्या वारसदारांमुळे मुंबई कायमची पाण्याखाली जाणार आहे.
No comments

चाणक्यांचा “या”पाच गोष्टी तुम्हाला मिळवून देतील व्यवसायात आणि नोकीरीत वृद्धी



“चाणक्यनीती” ही पुस्तक तुम्ही एकदा वाचली नक्की असेल, कुणी तुम्हाला वाचायला सांगितली असेल किंवा एकदा नजरेसमोर आलेलीच असते. गुरु चाणक्याच्या कार्यांवर आणि कारकीर्दीवर आधारित हे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध आहे. तुम्ही एकदा नक्की वाचावं. मी चानाक्यांबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे चाणक्य नीतीच्या काही गोष्टी आणि तथ्य जे तुम्हाला तुमच्या व्यवसायात आणि जॉबमध्ये मदत करतील.
  • गोड भाषा: आचार्य चाणक्य म्हणतात कि ज्याचं भाष्य चांगलं त्याच्या सभोवताल लोकांना रहायला आवडते. त्याच्यासोबत काम करायला आवडते.
  • नाव: जर तुम्हाला पैसा आणि नाव या दोन पैकी एक कमवायचं असेल तर तुम्ही नावलौकिक होण्याकडे जास्त लक्ष द्याव असं गुरु चाणक्य म्हणतात.
  • गुपित: चाणक्य म्हणतात कि आपलं गुपित कुणासमोर उघडकीस आणू नये; तुमचे गुपित लोकांसमोर उघडे झाले तर ते तुमच्याच विरोधात वापरून तुमच्या वाढत्या प्रतिमेला कीड लावू शकतात.
  • नकारात्मक विचार: जेव्हा मी लिहायला सुरुवात केली तेव्हा मलाही लोकांनी म्हटलं कि हे सगळं लिहून तू किती कमावशील? पण हा नकारात्मक विचार मी आपल्या डोक्यात ठेवला नाही आणि मेहनत करत राहलो आणि मला आवडणाऱ्या कामात मी वेळ घालवला.
  • पाणी: आचार्य चाणक्य म्हणतात कि माणसाने पाण्यासारखं असलं पाहिजे. आयुष्यात सर्व प्रकारच्या लोकांशी तुमचा संपर्क येऊ शकतो म्हणून जसं पाणी दिलं त्या रंगात आबी आकारात होऊन जाते त्याचप्रमाणे माणसाने परिस्थिती पाहून स्वतःमध्ये बदल केला पाहिजे.

  • जर या लेखाने तुमच्या विचारांमध्ये भर पाडली असेल तर याला नक्की शेयर करा आणि तुमच्याकडील काही अनुभव असतील तर आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.
No comments

आपल्या गावातच करा हा व्यवसाय, महिन्याला मिळतील २५००० रुपये


शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर युवकांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो रोजगाराचा ! हाताला काम नसेल तर घर चालवायचे कसे हा प्रश्न त्यातूनच निर्माण होतो. मग ग्रामीण भागातील तरूण नोकरीच्या शोधात शहरांकडे धाव घेतात.
यावर्षी भारतात गेल्या ४५ वर्षांतला सर्वात कमी बेरोजगारी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यावरुनच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सरकारचे रोजगारनिर्मितीचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.
याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक योजना आणली आहे, ज्याद्वारे आपल्या गावातून घरबसल्या महिन्याला २५००० रुपये कमावण्याची संधी बेरोजगारांना प्राप्त होणार आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या या योजनेचे नाव VIllage Level Entrepreneurs (VLE) असे आहे. इ-गव्हर्नन्स या योजनेच्या माध्यमातून सर्व सरकारी सेवा अल्पदरात नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने संपूर्ण देशात सामान्य सेवा केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
या केंद्रातून गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट क्षेत्रातल्या दूरसंचार, शेती, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, बँक, पतसंस्था, विमा इत्यादींची सर्व प्रकारची सर्टिफिकेट, फॉर्म, बिल भरण्यात येणार आहेत. हे केंद्र चालवणाऱ्या तरुणांना VIllage Level Entrepreneurs म्हणजेच “ग्रामस्तरावरील उद्योजक” म्हणुन ओळखले जाणार आहे.
ग्राम स्तर उद्योजक होण्यासाठी आणि केंद्र सुरु करण्यासाठी काय करावे लागेल ?
ग्राम स्तर उद्योजक होण्यासाठी https://csc.gov.in या वेबसाईटवर आपल्याला नोंदणी करावी लागते. त्यासाठी आधारकार्ड बंधनकारक आहे. या माध्यमातून आपण सामान्य सेवा केंद्र सुरु करण्यासाठी Online अर्ज करु शकता. Offline अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या ठिकाणी जाऊन माहिती घ्यावी.
त्यानुसार तुमच्या अर्जाचा विचार करुन केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाते. केंद्र सुरु करण्यासाठी तुमच्याकडे १००-१६० स्क्वेअर फुट जागा, एक कॉम्प्युटर, प्रिंटर, वेब कॅमेरा, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, इंटरनेट कनेक्शन ही सामग्री आणि जवळपास दोन-अडीच लाखांची गुंतवणूक करावी लागते.
असे मिळतील महिन्याला २५०००रुपये
सामान्य सेवा केंद्र स्थापन केलं केल्यानंतर त्याठिकाणी सरकारी तसेच खाजागी क्षेत्रातील अनेक सेवा देता येतात. त्यामध्ये आधारकार्ड काढणे, पॅनकार्ड काढणे, मतदान ओळखपत्र काढणे, मतदारयादीत नावाचा समावेश करणे. तसेच मोबाईलचे रीचार्ज, पोस्टपेड बिल भरणा, डिश टीव्ही रीचार्ज, पैसे पाठवणे, विमा हप्ता, वीज बिल भरणा, इन्शान इत्यादि सेवा देण्यात येतील. सरकारच्या माहितीनुसार सामान्य सेवा केंद्राच्या माध्यमातून महिन्याला सरासरी २५००० रुपये कमवता येतात.
No comments

कोणत्या देशाचा पासपोर्ट आहे जगात सर्वात जास्त शक्तिशाली आणि का ?


एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याकरिता पासपोर्टचा वापर केल्या जातो. सर्व कागदपत्रात शक्तिशाली म्हणून पासपोर्टची ओळख आहे. दुसऱ्या देशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे आणि या पासपोर्ट मुळे आपण कोणत्या देशाचे नागरिक आहो हे समजते. जास्त देशात जाण्या करिता आपणास विजा लागतो परंतु काही देशाचे पासपोर्ट असे आहे कि त्यांना बहुतांश ठिकाणी विजा लागत नाही.
कोणत्या देशाचा पासपोर्ट आहे सर्वात शक्तीशाली..
अमेरिकी एडवायजरी फर्म हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2018 (The Henley Passport Index ) च्या रिपोर्ट नुसार जगात जपानचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आणि चांगला मानल्या जातो. पासपोर्ट शक्तिशाली असणे म्हणजे त्या देशाच्या नागरिकास बिना VISA अनेक देशात प्रवास करता येतो. याच आधारावर पासपोर्टची ranking केल्या जाते कि त्या देशाचे नागरिक किती देशात बिना विसा फिरू शकतात.
हेन्ली पासपोर्ट इंडेक्सच्या अहवालानुसार जपानच्या नागरिकांना १९० देशात बिना विसा प्रवास करू शकता. या यादीत भारताचा क्रमांक ८१ आहे आणि दुसऱ्या नंबरला सिंगापूर हा देश येतो. आणि तिसऱ्या नंबर ला जर्मनी, फ्रांस आणि साउथ कोरिया आहे या देशाचे नागरिक १८७ देशात प्रवास करू शकतात. चौथ्या नंबरला डेनमार्क, फ़िनलैंड, इटली, स्वीडन, स्पेन आहेत.
या यादीत पाचव्या क्रमांकास नोर्वे, यूनाइटेड किंगडम, ऑस्ट्रिया, लूक्सेम्बर्ग, नीदरलैंड, पुर्तगाल, यूनाइटेड स्टेट्स आहे. या देशाचे नागरिक बिना विसा १८६ देशाचा प्रवास करू शकतात.
जापानची पासपोर्ट यंत्रणा फार पुरातन आहे बाहेर देशात प्रवास करण्यासाठी १८६६ मध्ये त्यांनी पहिला दस्तावेज बनविला होता. व्यापार आणि शिक्षणासाठी हे कागदपत्र त्यांना देण्यात येत होते. १८७८ पासून याला पासपोर्ट हा शब्द त्यांनी वापरात आणला. आधुनिक रूप त्यांनी पासपोर्ट ला १९२६ मध्ये दिले.
आणि १९९२ ICAO-compliant, machine-readable पासपोर्ट त्यांनी बनविला. २० मार्च २००६ पासून बायो मेट्रिक पासपोर्ट सर्व जपानी नागरिकांना देण्यात आले आहे. जपानच्या पासपोर्ट वर त्यांची शाही मोहर लावण्यात आली आहे. ज्यामध्ये सील लिपिमध्ये Nipponkoku Ryoken (日本国旅券) हे लिहलेले आहे.